मुंबई : मुंबईत पवई येथील साकी विहार रोडवरील हुंडाईच्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या.
अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. घटनास्थळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
शोरूममधून स्फोटाचा मोठा आवाज आला आणि आगीचा प्रचंड मोठा लोळ दिसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.