अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर
मेलबर्न (वृत्तसंस्था) : वर्षअखेर होणाऱ्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या १५ जणांचा संघ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी जाहीर केला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पारंपरिक आणि ऐतिहासिक अॅशेस मालिकेची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट विश्वाला असते. अॅशेस मालिका आव्हानात्मक असते. त्यामुळे संघात अनुभवी क्रिकेटपटूंसह युवांना स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी १५ जणांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर आढावा घेतला जाईल आणि मगच उर्वरित ३ सामन्यांसाठी संघ निवडला जाईल, असे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले.
मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी यजमान संघाचे नेतृत्व टिम पेनकडे कायम असून अनुभवी डेव्हिड वॉर्नरसह स्टीव्हन स्मिथसह मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा आणि झाय रिचर्डसनवर फलंदाजीची भिस्त आहे. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर एकही मॅच खेळलेला नाही. मात्र, बोर्डाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. आठवड्याच्या अखेर तो टास्मनियासाठी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसीय मॅच खेळून पेन त्यांचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
ऑस्ट्रेलिया संघात अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि ऑफस्पिनर मिचेल स्वीप्सनला स्थान दिले आहे. अनुभवी फास्ट बॉलर पॅट कमिन्सकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्यासह पाच वेगवान गोलंदाज संघात आहेत. स्वीप्सनसह नॅथन लियॉनवर फिरकी माऱ्याची भिस्त आहे.
आघाडी फळीतील फलंदाज मिचेल मार्शचा अॅशेस मालिकेतील संघात समावेश नाही. मात्र, तो राखीव क्रिकेटपटू आहे.
पहिल्या दोन कसोटीसाठीचा संघ : टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्कस हॅरिस, कॅमेरून ग्रीन, जोश हॅझ्लेवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅर्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मायकल नेसर, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीप्सन.