Wednesday, April 30, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

सौरव गांगुली आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी

सौरव गांगुली आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी

लंडन (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल दादाने आनंद व्यक्त केला आहे. आयसीसीच्या कार्यकारिणी समितीने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी यासंदर्भातील माहिती दिली. गांगुली यांनी त्याचा माजी सहकारी, महान लेगस्पिनर अनिल कुंबळे यांची जागा घेतली. २०१२पासून कुंबळे हे आयसीसी क्रिकेट समितीवर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आणि नंतर एक प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती म्हणून सौरव गांगुली यांचा अनुभव आयसीसीला पुढे जाण्यासाठी आणि क्रिकेट संदर्भातील निर्णयांना योग्य दिशा देण्यासाठी महत्वाचा ठरेल. मागील ९ वर्षे अनिल कुंबळे यांनी या पदाला योग्य न्याय दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कुंबळेच्या कालावधीमध्ये डीआरएस अधिक नियमितपणे वापरण्यापासून त्यात वेळोवेळी सुधारणा करत गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये सुधारणा झाली आहे. तसेच गोलंदाजीच्या शैलीसंदर्भातही या काळात निर्णय घेण्यात आले, असे बर्कली म्हणाले.

आयसीसीची क्रिकेट समिती क्रिकेटच्या खेळामधील महत्त्वाचे बदल, नियम आणि क्रिकेटचा अधिक अधिक प्रसार करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय़ घेण्याआधी त्यासंदर्भात विचार विनिमय करणे आणि ते निर्णय अंमलात आणण्यासंदर्भातील काम करते. आयसीसीने यावेळच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील क्रिकेटच्या परिस्थितीचा समीक्षा करण्यासाठी एका कार्यकालीन गटाची स्थापना करण्यात आली. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर येथील क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. खास करुन महिला क्रिकेटवरील संकटाबद्दल जगभरातील क्रिकेट जाणकार चिंतेत आहेत. महिलांना क्रिकेट खेळू न देण्याच्या तालिबानच्या भूमिकेमुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान पुरुष संघासोबतचा एकमेव कसोटी सामना रद्द केला आहे.

Comments
Add Comment