मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी चर्चगेट येथील रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांनी पुननिर्मित फ्रेरे रोड ओव्हर ब्रिज, पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील एकात्मिक देखरेख प्रणाली, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील अत्याधुनिक पॉड संकल्पनेवर आधारीत विश्रमालय कक्षाचे उद्घाटनही केले.
रावसाहेब दानवे यांनी अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकांवरील होम प्लॅटफॉर्म, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात फूट ओव्हर ब्रिज, एस्केलेटर, लिफ्ट्स आणि टॉयलेट ब्लॉक्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोच रेस्टॉरंट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथील एक्झिक्युटिव्ह वेटिंग हॉलचे लोकार्पण देखील केले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, आ. आशिष शेलार, आ. राहुल नार्वेकर, आ. मंगल प्रभात लोढा, आ. अतुल भातखळकर, आ. कॅप्टन तामिळ सेल्वन तसेच मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सर्व पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत केले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…