नाना पाटेकर, संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा यांचा समावेश
मुंबई (प्रतिनिधी) : दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार संगीतकार प्यारेलाल, ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, खासदार संजय राऊत, मीना मंगेशकर खडीकर यांना यंदाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आह.
यावर्षी, संगीत आणि कलेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना देण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कार तर दीनानाथ विशेष पुरस्कार ज्येष्ठ गायिका संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना जाहीर झाला आहे. अभिनेते प्रेम चोप्रा यांचीही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनाही रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आयुष्यभराच्या सेवेबद्दल मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार घोषित झाला आहे. खासदार संजय राऊत यांनाही पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.