Thursday, October 23, 2025
Happy Diwali

किशोर-किशोरी खो-खो संघ जाहीर

किशोर-किशोरी खो-खो संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : उना (हिमाचल प्रदेश) येथे होणाऱ्या किशोर-किशोरी गटाच्या ३१व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी खो-खो संघांची घोषणा महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी केली.

युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे मैदान निवड चाचणीतून दोन्ही संघ निवडण्यात आले. कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक खेळाडू मैदानात उतरले नव्हते. त्यात या खेळाडूंचा वयोगट १४ वर्षांखालील असल्याने सर्वच संघांना या वयोगटातील खेळाडूंना तयार करणे हे एक प्रकारचे आव्हानच होते. या मैदानी निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून ५२ मुले व ४६ मुली उपस्थित होत्या.

त्यामुळे निवडक खेळाडूंमधून महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करताना निवडसमिती सदस्य अजित शिंदे (सोलापूर), हरिष पाटिल (नंदुरबार), आनंद पवार (धुळे) व माधवी चव्हाण-भोसले (सातारा) यांना तारेवरची कसरत करावी लागली. संघ निवडीवेळी भारतीय खोखो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव अॅड. गोविंद शर्मा, खजिनदार अॅड. अरुण देशमुख, आयोजक कमलाकर कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

किशोर संघ : जिशन मुलाणी, मोहन चव्हाण (सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), तौफिक तांबोळी (पुणे), ईशांत वाघ (अहमदनगर), अथर्व पाटील (सांगली), सोत्या वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे (उस्मानाबाद), सागर सुनार (मुंबई उपनगर), नीरज खुडे (सातारा),

राखीव : गोविंद पाडेकर (नाशिक), आकाश खरात ( सांगली), रोहन सुर्यवंशी (धुळे).

प्रशिक्षक : प्रफुल्ल हाटवटे (बीड), व्यवस्थापक : मंदार परब, फिजिओ : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).

किशोरी संघ : सुषमा चौधरी, साई पवार (नाशिक), प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), धनश्री कंक, दीक्षा साठे (ठाणे), सायली कार्लेकर (रत्नागिरी), अंकिता देवकर, धनश्री करे (पुणे), समृद्धी पाटील, सानिका चाफे (सांगली), संचीता गायकवाड (सातारा), प्राजक्ता औशिकर (धुळे).

राखीव : कौशल्या कहाडोळे (नाशिक), साक्षी व्हनमाने (सोलापूर), किंजल भिकुले (मुंबई).

प्रशिक्षक : एजाज शेख (मुंबई). व्यवस्थापिका : प्रियांका चव्हाण (ठाणे).

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >