‘एक्स्प्रेस वे’ आधुनिक प्रतिभेचे प्रतिबिंब : नरेंद्र मोदी

  36

लखनऊ (वृत्तसंस्था) : ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’ उत्तर प्रदेशच्या विकासाचा, प्रगतीचा, नव्या निर्माणाचा तसेच भविष्यातील मजबूत अर्थव्यवस्थेचा महामार्ग आहे. हा ‘एक्स्प्रेस वे’ उत्तर प्रदेशमधील आधुनिक प्रतिभेचे प्रतिबिंब आहे. दृढ इच्छाशक्तीचे प्रकटीकरण आहे. उत्तर प्रदेशमधील संकल्प सिद्धीचे प्रमाण आहे. या प्रदेशची शान आहे, उत्तर प्रदेशची कमाल आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’ उपक्रमाचे कौतुक केले.


मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’चे उद्घाटन झाले. संपूर्ण जगात ज्या उत्तर प्रदेशच्या ज्या सामर्थ्यावर, उत्तर प्रदेशच्या लोकांच्या सामर्थ्यावर ज्यांना जराही शंका असेल, त्यांनी आज इथे सुलतानपूरमध्ये येऊन उत्तर प्रदेशचे सामर्थ्य पाहू शकतात. तीन-चार वर्षांपूर्वी जिथे केवळ जमीन होती. आता तिथून एवढा आधुनिक ‘एक्स्प्रेस वे’जात आहे. जेव्हा तीन वर्षे अगोदर मी ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’चे भूमिपूजन केलं होतं. तेव्हा हा विचारही केला नव्हता की एक दिवस त्याच ‘एक्स्प्रेस वे’वर विमानाने मी स्वतः उतरेल. हा ‘एक्स्प्रेस वे’उत्तर प्रदेशला जलदगतीपेक्षाही अधिक चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल, असे मोदी पुढे म्हणाले.


३४१ किलोमीटर लांबीचा हा ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’ पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशला जोडत आहे. लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन तो गाझीपूरला पोहोचतो. याच्या निर्मितीसाठी २२ हजार ४९७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा ‘एक्स्प्रेस वे’ लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकरनगर, आझमगढ, मऊ आणि गाझीपूर या ९ जिल्ह्यांतून जातो. जुलै २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे भूमिपूजन केले होते.



हवाईदलासाठी ताकद


जेवढी आवश्यक देशाची समृद्धी आहे, तेवढीच आवश्यक देशाची सुरक्षा देखील आहे. इथे थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत की, कशा प्रकारे आता आपत्कालीन परिस्थितीत ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’ आपल्या हवाई दलासाठी आणखी एक ताकद बनला आहे. आता काही वेळातच ‘पूर्वांचल एक्स्प्रेस वे’वर आपली लढाऊ विमाने उतरतील. डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चरला दशकांपर्यंत दुर्लक्षित केले, त्यांच्यासाठी या विमानाची गर्जना असेल, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये