मुंबई : मंगळवारी दिवसभरात राज्यात ८८६ इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सोमवारी ही संख्या ६८६ इतकी होती. काल दिवसभरात एकूण ९४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी ही संख्या ९१२ इतकी होती. मंगळवारी ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी ही संख्या १९ इतकी होती. काल झालेल्या ३४ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के इतके आहे.
मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ८४७ इतकी आहे. काल ही संख्या ११ हजार ९४३ इतकी होती. रुग्णवाढीचा विचार करता सर्वात जास्त रुग्णवाढ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत २१३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात ८७ नवे रुग्ण आढळले. पुणे मनपा क्षेत्रात ९६ नवे रुग्ण आढळले. तर पुणे जिल्ह्यात ६६ नवे रुग्ण आढळले. त्या खालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रात ३६, तर ठाणे जिल्ह्यात २० तसेच, नवी मुंबई क्षेत्रात ४१, कल्याण डोंबिवली क्षेत्रात २४, मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात १०, पनवेल मनपा क्षेत्रात २५, वसई विरार मनपा क्षेत्रात ११ आणि रायगडमध्ये ही संख्या ९ इतकी आहे.