Wednesday, November 13, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई

मुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई

११२७ किलो गांजा जप्त

मुंबई (प्रतिनिधी) : अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आले आहे. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३,००० किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळले होते. एनसीबीने केलेल्या तपासात नांदेडमधील हा गांजा आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममधून आणण्यात आल्याचे पुढे आले आहे. तसेच नांदेडमधून पुढे हा गांजा जळगाव आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एनसीबी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोरबी जिल्ह्यातील मालिया मियाणामधून ६०० कोटी रुपयांचे १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणाचं ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आले आहेत.

गुजरात एटीएसने या प्रकरणी ड्रग्जसोबत ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचंही समोर येत आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचं कनेक्शन पाकिस्तानसोबतच दुबईशी देखील असल्याचा आरोप होत आहे.

पाकिस्तानचा माफिया खालिदने भारतातील जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कँटीनमध्ये भेट घेतली होती, अशीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -