मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेले अनेक दिवस एसटी कामगार आंदोलन करत आहेत. दरम्यान आता बेस्ट कृती समितीने देखील बेस्टच्या महापालिकेतील विलीनीकरणाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. २०१९ मध्ये देखील बेस्ट कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
बेस्ट महापालिकेत सामील व्हावी ही बेस्ट कृती समितीची मागणी आहे. बेस्ट महापालिकेत विलीनीकरण करण्यासाठी बेस्ट समिती आणि पालिका सभागृहाने एकमताने ठराव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पण राज्य सरकारने अद्यापही त्याला मंजुरी दिलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा बेस्ट कृती समितीने राज्य सरकारला आठवण करून दिली आहे.