पेंग्विन देखभालीसाठीची मुदतवाढ महागात

  46

मुंबई (प्रतिनिधी) : अनेकदा वादाचा विषय ठरलेल्या पेंग्विनच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिलेल्या मुदतवाढीमध्ये पालिकेला केवळ ४३ दिवसांसाठी तब्बल ४५ लाखांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पेंग्विन देखभालीसाठीची मुदतवाढ महागात पडल्याचे दिसते. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.


पेंग्विन देखभालीसाठी पालिकेने २०१८ साली कंत्राट दिले होते. या कंत्राटाची रक्कम ११ कोटी ४६ लाख रुपये होती. हे कंत्राट सप्टेंबर २०२१ ला संपणार होते. मात्र नव्या कंत्राटदाराची नियुक्ती न झाल्याने पालिकेने याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ४३ दिवसांची मुदत वाढ दिली असून यात ४३ दिवसांसाठी ४५ लाख ८४ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. दरम्यान जर नवा कंत्राटदार मिळाला नाही, तर याच कंत्राटदाराला पुढे मुदत वाढ देण्यात येणार आहे.


महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी मागवलेल्या निविदांवर वाद निर्माण झाल्याने सुधारित निविदा मागविण्यात आल्या होत्या. आता निविदा भरण्याची मुदत संपली असून महिनाभरात नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Maratha Andolan : मराठा आरक्षण आंदोलन पाचव्या दिवशीही कायम, जरांगे पाटील उपोषणावर ठाम

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०