Saturday, October 25, 2025
Happy Diwali

देशमुख यांची कोठडी १४ दिवसांनी वाढवली

देशमुख यांची कोठडी १४ दिवसांनी वाढवली

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपा प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. सचिन वाझेला देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते.

आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment