सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी


आमदार नितेश राणे यांचे आवाहन




मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांचे भांडवल करून शुक्रवारी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेली दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.


त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावती, नांदेड, मालेगावात पडसाद


राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तसेच, मालेगावमध्ये पोलिसांनी परवानगी दिलेली नाही तरी मोर्चा निघतो, दगड फेकले जातात, ताकद दाखवली जातेय.


महाराष्ट्रात हिंदूंना घाबरवलं जातंय आणि महाराष्ट्र सरकार गप्प आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने हे मोर्चे थांबवले नाहीत, तर हिंदूंचेही मोर्चे निघतील, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही आ. राणे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List : कोकण ते विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा; संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचाच डंका, विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने विजयाची

Jejuri Bhandara Fire : जेजुरीत विजयोत्सवाचे रूपांतर दुर्घटनेत! विजयाच्या गुलालात आगीचा गोळा; फटाक्यांच्या ठिणगीमुळे नगरसेवकांसह १६ जण भाजले

जेजुरी : राज्यभरात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांची धामधूम सुरू असून, विजयी उमेदवारांकडून

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.