मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या बेछूट आरोपांच्या पार्श्वभूमीवर एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे, पत्नी क्रांती रेडकर तसेच बहीण यास्मीन वानखेडे यांनी मंगळवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत आम्ही वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती राज्यपालांना दिली, असे क्रांती रेडकर यांनी भेटीनंतर प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. संयम ठेवा.. सर्व काही ठीक होईल.. सत्याचाच नेहमी विजय होतो., असे राज्यपालांनी सांगितल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या.