Thursday, November 7, 2024
Homeक्रीडा‘भारताचा संघ जगातील महान संघ’

‘भारताचा संघ जगातील महान संघ’

निरोपावेळी रवी शास्त्री भावुक

दुबई (वृत्तसंस्था) : भारताने नामिबियावर नऊ विकेट राखून शानदार विजय टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचा शेवट गोड केला. तसेच कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना विजयी निरोप दिला. सामना संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंगरूममध्ये भावनिक भाषण केले आणि हा संघ भारतीय क्रिकेट इतिहासातील महान संघ असल्याचे सांगितले. आयसीसी ट्रॉफी जिंकून आम्ही ते अधिक चांगले करू शकलो असतो, पण हा खेळ आहे आणि भविष्यात आम्हाला त्यासाठी संधी मिळेल, असे शास्त्री म्हणाले.

तुम्ही एक संघ म्हणून माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जिंकलो. आपण प्रत्येक फॉरमॅटमध्ये जिंकलो आणि सर्व संघांना हरवले. यामुळे तुम्ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान संघ आहात. या संघाने गेल्या पाच-सहा वर्षांत उत्तम खेळ दाखवला आहे, असे शास्त्री ड्रेसिंगरूममध्ये म्हणाले.

गेल्या पाच-सहा वर्षांत या संघाने कशी कामगिरी केली हे निकालावरून दिसून येते. आपण आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो पण तसे झाले नाही आणि हाच खेळ आहे. तुम्हाला आणखी एक संधी मिळेल. तुम्ही पुढच्या वेळी भेटाल तेव्हा तुम्ही अधिक हुशार आणि अनुभवी असाल. माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तुम्ही जे मिळवता ते नाही, तर तुम्ही अडचणींवर कशी मात करता हे आहे, असे रवी शास्त्री म्हणाले. या भाषणानंतर शास्त्रींनी सर्व खेळाडूंना मिठी मारली.

‘आयपीएल’ आणि विश्वचषकामध्ये अवघ्या दोन दिवसांचा फरक भारताच्या सुमार कामगिरीसाठी कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत भारताचे मावळते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -