नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलपेक्षा देशाला प्राधान्य द्या, अशी प्रतिक्रिया माजी महान अष्टपैलू कपिल देव यांनी दिली आहे. काही क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग खेळणे पसंत करतात आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याला महत्त्व देत नाहीत. बीसीसीआयने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, क्रिकेटपटूंनी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याच्या कल्पनेच्या विरोधात मी नाही, पण क्रम उलट असावा, असा कपिल देव यांचा आग्रह आहे.
खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात, तेव्हा आपण काय म्हणू शकतो. खेळाडूंना त्यांच्या देशासाठी खेळण्याचा अभिमान वाटला पाहिजे. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत नाही त्यामुळे जास्त काही सांगता येत नाही. पण मला वाटतं आधी देशाचा संघ आणि नंतर फ्रँचायझी असावं. मी असे म्हणत नाही आहे की तिथे क्रिकेट खेळू नका (फ्राँचायझीसाठी), पण त्यांच्या क्रिकेटचे चांगले नियोजन करण्याची जबाबदारी आता बीसीसीआयवर आहे. या स्पर्धेतील आमच्यासाठी सर्वात मोठा धडा म्हणजे आम्ही केलेल्या चुका पुन्हा न करणे हा आहे, असे कपिल देव यांनी म्हटले.
माजी विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या पराभवांच्या कारणांकडे लक्ष वेधले आहे. बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटने नंतरच्या गोष्टींवर सोडून देण्याऐवजी पुढील विश्वचषकासाठी त्वरित नियोजन केले पाहिजे, असे त्यांना २०२२ मध्ये पुढील टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आयसीसीच्या आठ स्पर्धांमध्ये असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आता भविष्यातील सामन्यांकडे पाहण्याची वेळ आली आहे. तुम्ही ताबडतोब नियोजन सुरू केले पाहिजे. विश्वचषक संपल्यापासून भारतीय संघाचे संपूर्ण क्रिकेट संपले आहे असे नाही. जा आणि योजना करा, असा सल्ला कपिल देव यांनी बीसीसीआयला दिला आहे.