Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

Video : मुख्यमंत्रीपदासाठी निष्ठा विकली : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेची आठवण केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी करुन दिली. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी निष्ठा विकली, असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी हे सरकार बनण्याआधी पवारांबद्दल जे उद्गार काढले हे सांगतो. ‘पवारांना विनंती आहे की धरणाच्या आत अजित पवारांना नेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक म्हणजे अर्धवट मेंदूचे लोक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके. सोनिया गांधींनी काढून टाकल्यानंतर तुम्ही पुन्हा लाचारीने त्यांच्याकडे गेलात. शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू. नशीब महाभारतात शरद पवार नव्हते नाहीतर तिथेही फोडाफोडी केली असती’ ही विधानं उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी केली होती. आता मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून निष्ठा विकली, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

शिवसेना प्रमुखांनी गद्दारीने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केले नव्हते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली होती. याची आठवण करुन देताना शिवसेना प्रमुखांनी नाही तर त्यांच्या पुत्राने भाजपच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पद मिळाले. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज सगळीकडे धिंडवडे निघत आहेत, असा टोमणा राणेंनी मारला आहे.

Comments
Add Comment