मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारला लक्ष्य करताना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर भूमिका मांडली.
राणेंनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरून निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, फटाके वाजवा. पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता. त्यामुळे लोक परत एकदा प्रदूषणाधीन झाले आहेत, असे राणे म्हणाले.