नवी दिल्ली : सीमेजवळ लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीही कायम ठेवणार आहेत. यावेळी मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशरामध्ये जवानांबरोबर ४ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत.
गेले महिनाभर राजौरी आणि जवळच असलेला पूंछ परिसर हा चर्चेत आहे. कारण दोन वेगवेगळ्या दहशतवाद विरोधातील कारवायांमध्ये या भागात सहापेक्षा जास्त दहशतवादी हे ठार करण्यात आले आहेत. या भागात अतिशय तणावाचे वातावरण असताना पंतप्रधान मोदी यांचा राजौरी भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.