नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएच्ओ) टेक्निकल अॅडवायजरी ग्रुपने कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारची संस्था आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे.
कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे प्रयत्न सुरू होते. कोरोनाविरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोवॅक्सिनसह कोविशिल्ड या लसींचा सर्वाधिक उपयोग होत आहे. या दोन्ही लसींना सर्वप्रथम केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनला मंजुरी मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कमोर्तब करण्याची आवश्यकता होती.