नवी दिल्ली : हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची ग्रुप कॅप्टनपदी पदोन्नती झाली आहे. ते श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या ५१व्या स्क्वॉड्रनमध्ये आहेत. हवाई दलातील ग्रुप कॅप्टन हा लष्करातील कर्नलपदासमान असतो.
बालाकोटमध्ये २७ फेब्रुवारी २०१९ रोजी हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमाने भारताच्या दिशेने आली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडले होते.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना धडा शिकवल्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ हे विमान कोसळले होते. अभिनंदन यांनी विमानातून उडी मारली आणि पॅराशूटने जमिनीवर उतरले. पण त्यांचे पॅराशूट हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्याने अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानला अभिनंदन यांची सुटका करावी लागली होती.