Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

अनिल देशमुखांविरुद्ध पुरावे नाहीत: परमबीर

अनिल देशमुखांविरुद्ध पुरावे नाहीत: परमबीर

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितले आहे. आयोगाच्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली.

देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी मार्चमध्ये न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा