पुणे : लोकप्रिय रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे ८४व्या वर्षी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. तब्बल बाराशे कादंबऱ्या लिहिणाऱ्या नाईक यांनी मराठी वाचकांवर आपल्या लेखनाने गारूड केले.
नाईक यांच्या कादंबऱ्यांच्या अनेक प्रती निघाल्या. ग्रंथालयांमधून त्यांच्या कादंबऱ्यांना मागणी होती, मात्र १६ वर्षांपूर्वी मेंदूचा पक्षाघात झाल्यानंतर त्यांना काहीही लिहिता आलं नाही. त्यांच्यावर मागील वर्षी मुंबईतील केईएम रुग्णालयातही उपचार करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. गुरुनाथ नाईक हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरारकथा / कादंबरीकारांपैकी
एक होते.