Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडाफ्लॉप ठरल्यास अनुभवी क्रिकेटपटूंना वगळा

फ्लॉप ठरल्यास अनुभवी क्रिकेटपटूंना वगळा

कपिल देव यांचा बीसीसीआयला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिग्गज क्रिकेटपटूंची कामगिरी चांगली होत नसेल तर त्यांना वगळून तरुणांना संधी द्या, असा माजी महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयला दिला आहे.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीचा मार्गही बिकट झाला आहे. माजी क्रिकेटपटूही टीम इंडियाच्या कामगिरीवर निराश आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयला मोलाचा सल्ला दिला आहे. दिग्गज खेळाडूंची कामगिरी चांगली नसेल तर तरुणांना संधी द्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही दुसऱ्या संघांवर अवलंबून राहात असू, तर लाज वाटली पाहीजे. वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर आपल्या ताकदीवर उपांत्य फेरी गाठली पाहिजे. दुसऱ्या संघांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. टीम व्यवस्थापक आणि निवडकर्त्यांनी दिग्गज खेळाडूंचा भविष्य ठरवलं पाहीजे, असे कपिल देव यांनी सांगितले. बीसीसीआयला हा विचार करणं गरजेचं आहे की, तरुण खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे.


पुढची पिढी घडवण्यासाठी आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आमचे तरुण खेळाडू पराभूत होत असतील तर यात काही चुकीचं नाही. त्यांना अनुभव मिळेल. पण दिग्गज खेळाडू प्रदर्शन करत नसतील तर आपण खूपच खराब क्रिकेट खेळत आहोत. यावर टीका होणारच आहे. मला वाटत बीसीसीआयने यात हस्तक्षेप करावा आणि युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचा विचार करावा, असेही कपिल देव पुढे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -