नवी दिल्ली : मोदी सरकारने दिवाळी भेटीच्या नावाखाली पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू होणार आहेत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सामान्य जनता महागाईमध्ये भरडली जात असताना केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रुपये तर डिझेलमागे १० रुपये कमी करून तात्पुरता का होईना दिलासा दिला आहे. भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल ११० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज काही पैशांनी ते महागच होत आहे.