सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार

  53

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाद्य तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. देशात खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांनी तेलाच्या होलसेल किमतींमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अदानी विलमर, रुची सोया, जेमिनी एडिबल्स, मोदी नॅच्युरल्स, गोकुळ रिफॉइल्स, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो आणि एन. के. प्रोटेन्स या कंपन्यांचा समावेश आहे. सॉल्वेंट एक्ट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या कंपन्यांनी आपल्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.


या कंपन्यांनी होलसेल तेलविक्रीच्या किमतींमध्ये घट केली आहे. त्यानुसार, प्रतिटन तेलाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात प्रतिटन ४ हजार ते ७ हजार रुपये कमी केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून विक्री होणाऱ्या प्रतिलिटर तेलाच्या किमती ४ ते ७ रुपयांनी कमी झाल्या आहेत.


दरम्यान, जागतिक स्तरावर देखील खाद्यतेलाच्या पुरवठ्याची परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींवर देखील होण्याची शक्यता असून तेलाच्या किमती अजून कमी होऊ शकतात.


गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती आभाळाला भिडल्या आहेत. एकीकडे कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत केव्हाच शंभरीपार गेल्या असताना खाद्य तेलाच्या किमतींमुळे महागाईची झळ थेट सामान्यांच्या पोटापर्यंत पोहोचली आहे.

Comments
Add Comment

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद