Sunday, July 21, 2024
Homeदेशदिवाळीच्या शुभमुहूर्तावर केंद्र सरकारच्या तिजोरीत भर

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर केंद्र सरकारच्या तिजोरीत भर

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात २४ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट, शेअर मार्केटमध्ये तेजी याचा परिणाम जीएसटी संकलनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकारकडून सोमवारी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये जीएसटीचा विक्रमी वसुली झाली आहे. जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर एवढा कर जमा होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये १.३ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये २४ टक्के अधिक कर जमा झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट, शेअर मार्केटमध्ये तेजी याचा परिणाम जीएसटी संकलनावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावेळी १,३०,१२७ कोटी रुपये जीएसटी म्हणून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सीजीएसटी २३,८६१ कोटी रुपये, एसजीएसटी ३०,४२१ कोटी आणि आयजीएसटी ६७,३६१ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ३२,९९८ कोटी रुपयांसह) आणि उपकर ८,४८४ कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ६९९ कोटी रुपयांसह) आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वर्षभरातील हा दुसरा उच्चांक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये ते १.४ लाख कोटी रुपये होते जीएसटीच्या रूपात जमा झाले होते. या पूर्वी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १,१७,०१० कोटी रुपये होते. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १,१२,०२० कोटी रुपये आणि जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये होते. जूनमध्ये, जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजेच ९२,८८४९ कोटी रुपये होते. मे महिन्यात ते ९८,००० कोटी रुपये होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.४१ लाख कोटी रुपये होते.

दरम्यान, कंपन्यांनी उत्पादनात वाढ केल्याने आणि कच्च्या मालाची खरेदी वाढल्याने मागणी वाढल्याने ऑक्टोबरमध्ये भारतातील उत्पादन प्रक्रिया आणखी वाढली आहे. सोमवारी झालेल्या मासिक पाहणीत ही माहिती देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -