Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीसब्यासाचीने हटवली ‘ती’ वादग्रस्त जाहिरात

सब्यासाचीने हटवली ‘ती’ वादग्रस्त जाहिरात

मुंबई : बॉलीवूड ड्रेस व फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने नुकतेच लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लाँच करण्यासाठी ज्या पद्धतीने जाहिरात केली होती. ती पद्धत अनेकांना खटकली असून, सब्यासाची मुखर्जी याला कायदेशीर नोटीस बजविण्यात आली होती. अनेकांनी त्याच्या या मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल टीका सुद्धा केल्या. जाहिरातीमुळे वादात सापडलेला प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा मिळताच अखेर ती वादग्रस्त जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याची खंत व्यक्त करत त्यांनी माफीही मागितली आहे.

फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या खास ज्वेलरी कलेक्शनमधील डिझायनर मंगळसूत्राच्या आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली होती.

त्यांनी शेअर केलेल्या फोटोत मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेलचा वापर करण्यात आला होता. त्यावरून सोशल मीडिया युजर्स आणि वकील आशुतोष दुबे यांनी सब्यासाची मुखर्जी याला नोटीस बजावली. तसेच, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यासाची मुखर्जी याला ही जाहिरात काढून टाकण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देऊन, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता.

त्यानंतर तातडीने सब्यासाची मुखर्जीने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागितली. तसेच जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या अर्ध-नग्न मॉडेलचा फोट सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविला आहे. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे आणि एका विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे.

हिंदू धर्मात मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला जीवनसाथी बनवतो. या पवित्र नात्याला दृष्ट लागू नये म्हणून त्यात काळे मणीही असतात. सब्यसाची मुखर्जी यांच्या या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमध्ये लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राची जाहिरात करताना मॉडेलने डेनिम आणि ब्रा घालून फोटो सेशन केले आहे. तर त्यातील पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. हिंदू समाजात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या सौभाग्य अलंकाराची अशी बीभत्स जाहिरात केल्याने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.

त्यामुळे सोशल मीडिया यूझर्सनी सब्यसाची यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. समाजातून सब्यसाची यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली. अनेक महिलांनी त्यांची ज्वेलरी खरेदी करण्यावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केल्यानंतर सब्यसाचीने भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -