Friday, July 11, 2025

अनिल देशमुख ईडीसमोर हजर

अनिल देशमुख ईडीसमोर हजर

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सोमवारी स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले. त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्यांनी आपलं शेवटचं ट्वीट २ जुलैला केलं होतं. त्यानंतर काल त्यांनी भूमिका स्पष्ट केली.


ईडीला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की, माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.


ईडीने आमच्या सर्व घरांवर छापे टाकले, तेव्हा मी व माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी ईडीला सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स दिले, असे देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा