Sunday, August 31, 2025

लाच प्रकरणात एसीपी सुजाता पाटील निलंबित

लाच प्रकरणात एसीपी सुजाता पाटील निलंबित

मुंबई : लाच प्रकरणात एसीपी सुजाता पाटील यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्याशिवाय पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सुजाता पाटील यांना काही दिवसांपूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले होते. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. सुजाता पाटील यांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती.

मात्र या कृत्याची गंभीर दखल घेत, शासनाने पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याशिवाय पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज होता.

Comments
Add Comment