Saturday, June 29, 2024
Homeताज्या घडामोडीसेन्सेक्स कोसळला, निफ्टीच्याही गटांगळ्या!

सेन्सेक्स कोसळला, निफ्टीच्याही गटांगळ्या!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने नवनवे उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजार अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनं आता उलट्या दिशेने प्रवास सुरू केलाय की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी २७० अंकांनी घसरलेला शेअर निर्देशांक गुरुवारी तब्बल ११५९ अंकांनी घसरला आहे. बाजार सुरू होताच ३०० अंकांनी घसरलेला सेन्सेक्स पुन्हा सावरू शकलाच नाही. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सची ११५९ अंकांनी घसरण होऊन तो शेवटी ६० हजारांच्या खाली स्थिरावला. शेवटी सेन्सेक्सचा आकडा ५९ हजार ९८५ अंक इतका खाली आला होता. सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनं देखील उलटा प्रवास केला.

सेन्सेक्स जवळपास १.७ टक्क्यांनी खाली उतरल्यानंतर निफ्टीमध्ये देखील जवळपास १.७७ टक्क्यांची घट दिसून आली. निफ्टी जवळपास ३२२ अंकांनी खाली येऊन १७ हजार ८५७ अंकांवर स्थिरावला. दरम्यान, शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचे तब्बल ४.५ लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती रिलायन्स सेक्युरिटीजचे स्ट्रॅटेजी प्रमुख विनोद मोदी यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. हेवीवेट फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इक्विटीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला, असं देखील ते म्हणाले.

आयटीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अॅक्सिस बँक आणि टायटन यांचं आज सर्वाधिक नुकसान झालं असून त्यांचे शेअर्स ५.५४ टक्क्यांनी खाली आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -