Sunday, July 14, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडविरुद्दच्या सामन्यासाठी हार्दिक फिट!

न्यूझीलंडविरुद्दच्या सामन्यासाठी हार्दिक फिट!

गोलंदाजीच्या सरावाला सुरुवात

दुबई (वृत्तसंस्था) : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट असून त्याने बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीसह त्याने सहाव्या क्रमांकावर आपली दावेदारी मजबूत केली आहे.

मागील रविवारी पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवला होता. या सामन्यात फलंदाजी करताना उजव्या खांद्याला चेंडू लागून हार्दिकला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता होती. अशातच टीम इंडियासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. तथापि, हार्दिकने बुधवारी दुबईत स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई आणि फिजिओ नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली सराव सुरू केला. हार्दिकने नेट्समध्ये भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूरसोबत २० मिनिटे गोलंदाजी केली.

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी हे हार्दिकच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करतांना दिसू शकेल. हार्दिक गोलंदाजी करत नसल्याने भारताला एका गोलंदाजाची कमतरता जाणवत आहे.

कोहली, राहुलची घसरण

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर के. एल. राहुल यांची ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे एक आणि दोन स्थानांची घसरण झाली आहे. कोहली ७२५ गुणांसह पाचव्या, तर राहुल ६८४ गुणांसह आठव्या स्थानी आहे. भारताविरुद्ध नाबाद ७९ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -