Friday, May 9, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

३५ क्रीडापटूंची अर्जुनसाठी शिफारस

३५ क्रीडापटूंची अर्जुनसाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीने ११ खेलरत्न पुरस्कारांसह ३५ अर्जुन पुरस्कारांसाठी क्रीडापटूंची शिफारस केली. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमुळे यंदा क्रीडा पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे यंदा पुरस्कारांना उशीर झाला आहे.


देशात १९६१मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरु खेलरत्नसाठी एकाच वेळी इतक्या खेळाडूंची शिफारस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी ५ खेळाडूंना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती.


खेलरत्न हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या देशातील विविध भागातील खेळाडूंना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (आयओए) आणि स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियाकडून (साइ) खेळाडूंच्या नावाची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात. 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्काराची सुरुवात १९९१ मध्ये आली. हा पुरस्कार आधी राजीव गांधींच्या नावाने ओळखला जायचा. या वर्षी त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार ठेवण्यात आलं आहे. त्या आधी अर्जुन पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जात होता.


Comments
Add Comment