आर्यनच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी

  23

मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याला मंगळवारीही दिलासा मिळू शकला नाही. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केले असून या अर्जांवरील सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. या तिन्ही अर्जांवरील उर्वरित सुनावणी आता बुधवारी दुपारी होणार आहे. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


जामीन अर्जावर आर्यनतर्फे आज युक्तिवाद झाला, तर अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यातर्फे युक्तिवाद अपूर्ण राहिला. त्यामुळे तिन्ही अर्जांवरील पुढील सुनावणी न्यायमूर्ती नितीन सांब्रे हे आता उद्या दुपारी करणार आहेत. आर्यनच्या वतीने सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.


‘बाहेरच्या आरोप - प्रत्यारोपांशी आमचा काहीच संबंध नाही, हे आम्ही प्रतिज्ञापत्रावरही स्पष्ट केलेले आहे’, हे रोहतगी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आर्यनच्या विरोधात केसच होऊ शकत नाही, असे नमूद केले.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर