मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याला मंगळवारीही दिलासा मिळू शकला नाही. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केले असून या अर्जांवरील सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. या तिन्ही अर्जांवरील उर्वरित सुनावणी आता बुधवारी दुपारी होणार आहे. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
जामीन अर्जावर आर्यनतर्फे आज युक्तिवाद झाला, तर अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यातर्फे युक्तिवाद अपूर्ण राहिला. त्यामुळे तिन्ही अर्जांवरील पुढील सुनावणी न्यायमूर्ती नितीन सांब्रे हे आता उद्या दुपारी करणार आहेत. आर्यनच्या वतीने सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.
‘बाहेरच्या आरोप – प्रत्यारोपांशी आमचा काहीच संबंध नाही, हे आम्ही प्रतिज्ञापत्रावरही स्पष्ट केलेले आहे’, हे रोहतगी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आर्यनच्या विरोधात केसच होऊ शकत नाही, असे नमूद केले.