मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिका कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून बोनस दिला जाणार असल्याचे समजते. याबाबतची घोषणा बुधवारी महापौर किशोरी पेडणेकर करणार असल्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना यंदा १६ हजार रुपये बोनस मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
अद्यापही दिवाळीच्या बोनसची घोषणा न झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र महापौर किशोरी पेडणेकर या बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत चर्चा करतील आणि त्यानंतर त्या घोषणा करतील असे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी १५ हजार ५०० रुपये बोनस एका कर्मचाऱ्याला मिळाला होता. यावर्षी ५०० रूपये वाढवून १६ हजार रूपये बोनस मिळण्याची शक्यता आहे.