न्यूझीलंडला हरवण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य

Share

शारजा (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील ग्रुप २मधील आणखी एका महत्त्वपूर्ण लढतीत मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनसामने आहेत. माजी विजेता आणि परंपरागत प्रतिस्पर्धी भारताला हरवल्यानंतर किवींवर विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य ठेवले आहे.

सलामीच्या लढतीवर ग्रुप २ची पुढील गणिते अवलंबून होती. या लढतीत पाकिस्तानने बाजी मारताना आश्वासक सुरुवात केली. भारतानंतर आता त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. कागदावरील कामगिरी पाहता पाकिस्तानने त्यांच्या या प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले आहे. टी-ट्वेन्टी प्रकारातील रँकिंग पाहता पाकिस्तान तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. दोघांमध्ये केवळ सहा रेटिंग गुणांचा फरक आहे.

उभय संघांमधील मागील पाच सामन्यांच्या निकालात पाकिस्तानने ३-२ अशी आघाडी घेतली आहे. मायदेशात झालेली तीन सामन्यांची मालिका न्यूझीलंडने २-१ अशा फरकाने जिंकली. मालिका गमावली तरी तिसरी आणि शेवटची लढत जिंकून पाकिस्तानने व्हाइटवॉश टाळला. घरच्या मैदानावर पाकिस्तानला या मालिका पराभवाचा वचपा घेण्याची संधी होती. मात्र, सुरक्षेचे कारण पुढे करताना न्यूझीलंडने सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान सोडले. दौरा अचानक रद्द केल्याने पाकिस्तान बोर्ड निराश झाले आहे. टी-ट्वेन्टी मालिकेतील पराभव आणि अर्धवट सोडलेला दौरा अशा दोन्ही गोष्टींचा बदला घेण्याची संधी पाकिस्तानला चालून आली आहे.

पाकिस्तान संघाने भारताला दहा विकेटनी हरवत धडाकेबाज सुरुवात केली. प्रभावी गोलंदाजी हे त्यांचे बलस्थान आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने अप्रतिम मारा केला. त्याला हसन अली आणि हॅरिस रौफसह लेगस्पिनर शादाब खानची चांगली साथ लाभली. कर्णधार बाबर आझमसह मोहम्मद रिझवानने अप्रतिम फलंदाजी करताना अन्य फलंदाजांना मैदानावर उतरण्याची संधी दिली नाही. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडकडे डेव्हॉन कॉन्वे, मार्टिन गप्टील, टिम सीफर्ट, जेम्स नीशॅम, मार्क चॅपमन असे दमदार फलंदाज आहेत. तसेच आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजी केलेला डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, काइल जॅमिसन, मिचेल सँटनर हे चांगले. गोलंदाज आहेत. मालिकाविजय पाहता प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व मिळवण्याची संधी आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

7 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

8 hours ago