मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करत एका वकिलाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आला आहे. वकील सुधा द्विवेदी यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तसेच सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंभे आणि राज्य लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या कार्यालयात तक्रार सादर केली आहे.
तक्रारीत, द्विवेदी यांनी वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे, ज्यात ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे साक्षीदार प्रभाकर साईल आणि केपी गोसावी आणि सॅम डिसोझा नावाच्या एका व्यक्तीच्या कथित खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
आरोप फेटाळले
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी मंत्री मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘आमचे कुटुंब तपासासाठी तयार आहे. मलिक यांच्या टार्गेट करण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की ‘कृपया ट्विटर किंवा फेसबुकला न्यायालय किंवा न्याय व्यवस्था समजू नका. तुम्ही तुमचे पुरावे घेऊन कोर्टात जा. तुमचा पुरावा खरा आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कोर्टात का नाही जात? ट्विट का करता?’, यास्मिन म्हणाल्या की, त्यांना माहीत आहे की, त्यांचे आरोप चुकीचे आहेत.