Friday, July 19, 2024
Homeक्रीडाआकाश, रोहितचा परफेक्ट पंच

आकाश, रोहितचा परफेक्ट पंच

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

शिवा थापाचीही विजयी सुरुवात

बेलग्रेड (वृत्तसंस्था) : भारताचे युवा बॉक्सर आकाश संगवान आणि रोहित मोरने एआयबीए पुरुष जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत धडाकेबाज खेळ करताना प्रतिस्पर्ध्यांवर ५-० अशा फरकाने विजय पटकावला. अनुभवी शिवा थापानेही विजयी प्रारंभ केला.

२०१५मध्ये कांस्यपदक जिंकणारा अनुभवी बॉक्सर शिवा थापाने सलामीला केनयाच्या व्हिक्टर ऑढियांबो याडेरावर ५-० अशी मात केली. त्यापूर्वी, ६७ किलो गटात मंगळवारी आकाशने तुर्कीच्या फुरकन अडेमचा ५-० असा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. राष्ट्रीय विजेता संगवानने प्रतिस्पर्धी बॉक्सरला वरचढ होण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या फेरीत त्याची गाठ जर्मनीच्या डॅनियल क्रॉटरशी पडेल. त्याला सलामीला पुढे चाल (बाय) देण्यात आली होती.

आकाशपूर्वी, रोहितने पदार्पणात छाप पाडली. ५७ किलो गटात त्याने इक्वॅडोरच्या जीन कॅइसीडोचा ५-० असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर बोस्निया आणि हर्झेगोविनाचा बॉक्सर अलेन रहिमिकचे आव्हान आहे. रोहितला सलामीला बाय मिळाली होती. त्याच्यासह आशियाई विजेता संजीत (९२ किलो), सचिन कुमार (८० किलो) या भारताच्या बॉक्सर्सना पुढे चाल देण्यात आली. दुसऱ्या सामन्यात सचिनची गाठ अमेरिकेचा रॉबी गोन्झालेझ तसेच संजीतची गाठ रशियाच्या आंद्रे स्टॉत्सकीशी पडेल.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत १०० हून अधिक देशांचे ६००हून अधिक बॉक्सर सहभागी झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -