Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीवसईमध्ये रस्त्यांच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य

वसईमध्ये रस्त्यांच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य

कीर्ती केसरकर

नालासोपारा : गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा निर्माण झालेली पूरस्थिती, नागरिक व पर्यटकांकडून अस्ताव्यस्त टाकण्यात येणारा कचरा यामुळे वसई-विरारच्या मुख्य रस्त्यांच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जाताना शेकडो वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रोजच कचरा टाकला जात असताना वसई-विरार महापालिकेकडून कोणतीच दखल घेतली जात नाही आहे. परिणामी त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे.

सामान्य नागरिक नालासोपारा, वसई गाव, निर्मळ, भुईगाव, गिरीज, विरार, सोपारा रोज या मार्गांचा वापर करतात. तसेच याठिकाणी पर्यटन स्थळेसुद्धा भरपूर असल्याने पर्यटकांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत येथील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुर्गंधी व विविध आजार पसरण्याची शक्यता आहे. या वर्षी पावसाळ्यात अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाण्यातून वाहून आलेला कचरा रस्त्याच्या किनाऱ्यावर येऊन अडकला आहे. महानगरपालिकेने अजूनही तो उचलून रस्त्याची स्वच्छता केलेली नाही. पर्यटक या ठिकाणी फिरण्यास येतात मात्र, कचरा बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला टाकून निघून जातात. याचबरोबर रहिवासी व इतर नागरिकांना कचरा, कचरा कुंडीत टाकण्याचा आळस आला तर ते रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात.

तसेच, कचरा उचलण्यासाठी पालिकेची कचरा उचलणारी गाडी नियमित वेळेत येत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहे. बाजारातील कुजलेल्या भाज्या, टाकावू वस्तू याचा सर्वाधिक त्रास इथून जाणाऱ्या वाहन चालकांना होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांना व नागरिकांना येथून जाताना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वसई-विरार महापालिका करत असली तरी मात्र या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही व जे कचरा टाकतात त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांचे
फावत आहे.

वाढत्या कचऱ्याने दुर्गंधीचा त्रास

महानगरपालिका कचरा पसरवणाऱ्या पर्यटक व नागरिकांवर कठोर कारवाई करत नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच नागरिकांना पूरस्थितीमुळे साठलेला कचरा पालिका स्वछ करत नसल्याने कचरा कुजून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरू लागली आहे. पालिकेने त्वरितच कचऱ्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -