अपेक्षाभंग!

दुबई (वृत्तसंस्था): कुठल्याही खेळात गत कामगिरीच्या आधारे निकाल ठरवता येत नाही. त्या-त्या दिवशी सरस कामगिरी करणारा संघ जिंकतो. यूएईत सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप क्रिकेटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी भारताच्या चाहत्यांना तसा अनुभव आला. माजी विजेता भारताचा संघ वर्ल्डकपमध्ये प्रथमच पाकिस्तानविरुद्ध हरला, तोही दहा विकेटनी. लाजिरवाण्या पराभवापेक्षा विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी अपेक्षाभंग केल्याचे दु:ख अधिक आहे.


टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताने यापूर्वी पाच वेळा बाजी मारली होती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानने जिगरबाज खेळ करून पराभवांची मालिका खंडित केली. १५२ धावांचे आव्हान फार मोठे नसले तरी प्रतिस्पर्ध्यांनी दहा विकेट राखून मिळवलेला विजय जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे. भारताच्या नावाजलेल्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहणे जड झाले. त्याच खेळपट्टीवर मोहम्मद रिझवान (५५ चेंडूंत नाबाद ७८ धावा) आणि कर्णधार बाबर आझमने (५२ चेंडूंत नाबाद ६८ धावा) केलेली फटकेबाजी म्हणजे भारताच्या अनुभवी गोलंदाजांचे मोठे अपयश आहे. त्यामुळे बॅटरप्रमाणे बॉलरही पराभवासाठी तितकेच जबाबदार आहेत. स्विंग टाकण्यात तरबेज असलेल्या मध्यमगती भुवनेश्वरने तीन षटकांत २५ धावा दिल्या. अनुभवी मोहम्मद शमी (४२-०)आणि जसप्रीत बुमरानेही (२२-०) स्वैर गोलंदाजी केली. त्याचा फायदा पाकिस्तानच्या ओपनर्सनी उठवला. नवोदित वरुण चक्रवर्ती (३३-०) आणि रवींद्र जडेजाने (२८-०) निराशा केली.


त्यापूर्वी, भारताला स्टार फलंदाज रोहित शर्मासह लोकेश राहुलकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, दोघांनीही निराशा केली. उपकर्णधार खातेही उघडू शकला नाही. राहुल केवळ तीन धावा करू शकला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने अप्रतिम स्पेल टाकताना पाकिस्तानला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.


ओपनिंग जोडी लवकर बाद झाल्याने मधल्या फळीवर दडपण आले. कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर टिकून राहण्याचे धाडस दाखवले तरी रिषभ पंत वगळता अन्य फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाही. सूर्यकुमार यादवसह अष्टपैलू जोडी हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाला दडपण हाताळण्यात अपयश आले.


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याच्या गोलंदाजांचा वापर योग्य प्रकारे केला. डावखुऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने विश्वास सार्थ ठरवल्यानंतर त्याने इमाद वासिमला थांबवताना दुसरा मध्यमगती गोलंदाज हसन अलीला गोलंदाजीला आणले. त्यानेही विकेट घेतली. शेवटच्या षटकांमध्ये अली थोडा महागडा ठरला तरी शादाब खान आणि हॅरिस रौफने त्यांचा कोटा पूर्ण करतानाच एकेक विकेटही घेतली.

Comments
Add Comment

Rohit Sharma : ‘हिटमॅन’च्या निवृत्तीच्या बातम्यांना पूर्णविराम; लॉर्ड्स वनडेबाबत बीसीसीआयचा मोठा खुलासा

मुंबई : भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स (Lord's) येथे

Garry Sobers Death : पहिलंच शतक आणि थेट विश्वविक्रम; गॅरी सोबर्स यांचा थक्क करणारा प्रवास

मुंबई : क्रिकेट (Cricket) विश्वातील सर्वकालीन महान अष्टपैलू (All-rounder) खेळाडूंमध्ये गणले जाणारे सर गॅरी सोबर्स (Sir Garry Sobers)

Sir Garfield Sobers : सर गारफिल्ड सोबर्स यांचे ८९ व्या वर्षी निधन

ब्रिजटाउन : क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडूंचे प्रतीक मानले जाणारे सर गारफिल्ड सोबर्स

Rohit Sharma : रोहित शर्माला निवृत्त झाला तरी दरवर्षी BCCI देणार इतक्या लाखांची पेन्शन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या

The 2026 FIFA World Cup final match : स्लाव्हको विन्सिच यांच्याकडे सोपवली महाअंतिम सामन्याची धुरा

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक २०२६ च्या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा करण्यात आली असून,

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान