सोनाली

  36

कथा : डॉ. विजया वाड


सोनालीला प्रथमच बघायला शंतू येणार अशी शेजारी बातमी पसरली.


परिचय विवाह...! शंतनू डॉक्टर! सोनाली पीएच.डी. शंतनू झाकीत! आपल्याच! शंतनू-सोनाली मात्र स्वस्थ चित्त होती. शंतनू सोनालीला बघून खूश झाला.


चहा-पोहे... झाले. रूढी परंपरा! हो!


“मी नवविचारांचा आहे.” “मीही!”


“मुली बघणे मला पसंत नाही.”


“मलाही.” सोनाली मनापासून म्हणाली.


“तुम्ही डॉक्टर, मी डॉक्टोरेट. मला पन्नास हजार पगार आहे.” सोनाली म्हणाली. “सोनाली, मी लाखभर कमावतो सहज.” “मला पैशांचे विशेष आकर्षण नाही. सुबत्ता मी लहानपणापासून बघितली. कुक पाणके... हाताशी होते.”


“तिथेही मिळतील.”


“यूएसमध्ये जाण्याचा विचार नाही ना? तिथे हातानं काम करावं लागतं. ताई यूएस् मध्येय. रवा कसा दिसतो इथे पण ठाऊक नव्हतं तिला. सर्जन आहे... ती!” “आता सारं येतं.” “शिकलं की सारं येतं.”


“शिकेन… तर!” शिकायची मला नाही हौस.” “आय बेटर थिंक अगेन.” शंतनू. पण विवाह ठरला. सोनाली स्पष्टवक्ती होती.


“हे पाहा, मला देणं-घेणं, व्यवहार पसंत नाही. सह्यांचं लग्न!” “कधी तरी अशी पद्धत, जुळणं महत्त्वाचं.” तो नेटाने म्हणाला. “शंतनू, ग्रेट! आपले विचार जुळतात.”


“भेटीगाठीत अधिक स्पष्ट होईल.” शंतनू म्हणाला.


“नोकरीत पहिले १० हजार मी माहेरी देणं पसंत करेन.” “मला चालेल ४०, तर सासरी देशील ना?”


“नक्की.” “नंतर कटकट नाही ना करणार?” “नाही करणार.” ती म्हणाली. नंतर तो म्हणाला.


“सोनाली, सासर ही स्वतंत्र घटना आहे.” “मला कल्पना आहे. तुझे आई-वडील, योग्य तो मान ठेवीन मी. मला आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्य हवे आहे. मी बसून राहणार नाही... वचन देते! मी दमते... माणूस आहे मी! याची कल्पना सासरी असावी.” “शेवटची …अट काय?”
“पंचवीस वर्षे… हे नाव वापरले. सोनाली राजहंस!” “मग?” “तेच वापरणं आवडेल मला!”
“अॅग्रीड” “ओह! वंडरफूल.” “डॉ. सोनाली! मग?” “सहीचा विवाह. विनाविलंब!”
मित्रांनो, सोनाली राजहंस आणि शंतनू रणदिवे यांचेशी लग्न अखेर ठरले. निवडक मित्र-मैत्रिणी आले होते. फारसा खर्च नाही. इतकी सुंदर पार्टी झाली म्हणून सांगू?
शिणोटा नाही. काही नाही. मान-पान सगळ्यांना फाटा! सोनाली राजहंस डॉ. शंतनूकडे आली. सासूच्या मनोभावे पाया पडली. “बाबा, मी रजा घेऊ शकत नाही.” सासरेबुवा चकित झाले.
“नोकरी जबाबदारीची आहे.”
“मी समजू शकतो,” बाबा म्हणाले.
“बाबा. हे पाकीट सांभाळा. जपून!” पाकिटात १० हजार रुपये होते. ज्या विश्वासाने सांभाळ करायला दिले... ते पाहून म्हणाले, हे बरेच पैसे आहेत.”
“तुमचे माझे वेगळे काही नाही.” सोनाली हसून म्हणाली. “असं?”
“खर्च केले तरी हरकत नाही.” फक्त हिशेब ठेवा. मी विचारत नाही बसणार. अनाठायी! खर्च नको.” सोनाली स्पष्ट म्हणाली. ते कुटुंब सुखी आहे. सोनाली स्वातंत्र्य जपून आहे.
तुम्हाला सासरी काय हवे? स्वातंत्र्य, समता, बंधुता? अगदी तस्से सोनाली राजहंसला मिळाले आह अशी लग्ने व्हावी, असे विवाह व्हावेत..
आपणासही वाटते ना? माझ्या एका मुलीने आपले नाव बदलले नाही... तेच ठेवले... पटते ना! मस्तच!

Comments
Add Comment

नौदलात थेट भरती

करिअर : सुरेश वांदिले भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी. टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत

‘वंदे भारत‌’मुळे नव्या काश्मीरची उभारणी

विशेष : प्रा. सुखदेव बखळे कतरा ते श्रीनगर या ‌‘वंदे भारत एक्स्प्रेस‌’ला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ

मुले मोठी होताना...

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजर्सना वाढवणं जेवढं कठीण तेवढेच टीनएजर होणंही अवघड. असं का बरं? कारण आपल्या

आषाढ घन

माेरपीस : पूजा काळे किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो... खुल्या चांदण्याची

सोशल मीडिया आणि वैवाहिक जीवन

आरती बनसोडे (मानसिक समुपदेशक, मुंबई ) पूर्वीचा काळ आणि हल्लीचा काळ यामध्ये मोठा बदल झाला आहे तो म्हणजे वाढत्या

ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे