भाजपच्या मोहित कम्बोज यांचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी एनसीबी तपास करीत आहे. यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार आक्षेप घेत विरोध आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अशातच माजी पदाधिकारी मोहित कम्बोज यांनी आघाडी सरकारवरच संशय व्यक्त केला आहे.
कॉर्डेलिया क्रूझ संदर्भात सरकारमधील मंत्र्यांचा १०० टक्के सहभाग असून वेळ आल्यानंतर सर्वांची नावे जाहीर करणार असल्याचा इशारा मोहित कम्बोज यांनी दिला आहे. मंदिरे ७ ऑक्टोबरला सुरू झाली, मग त्या आधीच म्हणजे २ ऑक्टोबरला क्रूझ पार्टीची परवानगी कुणी दिली, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.