Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीगगनचुंबी इमारतींमध्ये आगीच्या १५६८ घटना

गगनचुंबी इमारतींमध्ये आगीच्या १५६८ घटना

दहा वर्षांतील आकडेवारी; माहिती अधिकारातून समोर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील गगनचुंबी इमारतींत तब्बल १५६८ आगीच्या घटना घडल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी २००८ ते २०१८ दरम्यान लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती मागवली होती. त्यानुसार दहा वर्षांत मुंबईत तब्बल ४८,४३४ आगीच्या घटना घडल्याची माहिती शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे २००८ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आगीच्या घटना घडल्या आहेत? आणि किती गगनचुंबी इमारतींना आग लागली? याबाबत माहिती मागवली होती.

या दरम्यान ४८,४३४ आगीच्या घटना घडल्या असून असून उंच इमारतीत १५६८ घटना घडल्या असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. तसेच ८७३७ रहिवासी इमारतींत आग लागल्या आहेत. तसेच ३८३३ व्यावसायिक इमारतींत आग लागली आहे आणि ३१५१ झोपडपट्ट्यांमध्ये आग लागली आहे.

सर्वात जास्त तब्बल ३२५१६ घटनेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. १११६ घटनांमध्ये गॅस सिलिंडर लिकेजमुळे आग लागली आहे. ११,८८९ घटनांमध्ये अन्य कारणांमुळे आग लागली आहे. एकूण ६०९ लोकांचा आगीमुळे मृत्यू झाला आहे. त्यात २१२ पुरुष व २१२ स्त्री आणि २९ मुलांचा समावेश आहे.

तसेच आगीच्या घटनेत ८९,०४,८६,१०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर २०२० मध्ये एकूण ३८४१ आगीच्या घटना घडल्या आहेत, यात ३३ जणांचा मृत्यू आणि १०० जण जखमी झाले आहेत.

परिमंडळ ५ च्या हद्दीत १२७३ आगीच्या घटना

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ ३ या हद्दीत एकूण ४९६ आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवासी इमारतीत परिमंडळ – ६ या हद्दीत १८३५ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ १ च्या हद्दीत ९८७ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यांत परिमंडळ ५च्या हद्दीत १२७३ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -