Friday, June 13, 2025

रोहित शर्मा हा भारताचा इंझमाम : शोएब अख्तर

रोहित शर्मा हा भारताचा इंझमाम : शोएब अख्तर

दुबई (वृत्तसंस्था) : रोहित शर्मा हा भारताचा इंझमाम-उल-हक असल्याचे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे.


भारत चांगला संघ नाही, असे म्हणणारे पाकिस्तानमध्ये कोणीही नाही. ते भारतीय संघाचे उघडपणे कौतुक करतात. ते विराट कोहलीला रोहित शर्मापेक्षाही एक महान क्रिकेटपटू मानतात. रोहित हा भारताचा इंझमाम-उल-हक असल्याचे पाकिस्तानमधील लोक म्हणतात. रिषभ पंतची तिथे प्रशंसा केली जाते. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली ते आश्चर्यकारक होते. त्यानंतर सूर्यकुमार यादवचे खूप कौतुक केले जाते. पाकिस्तानमध्ये भारतीय क्रिकेटबद्दल बऱ्याच सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, असे शोएबने सांगितले.


तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, तर ते द्वेषावर आधारित नाहीत. माझा विश्वास आहे की माजी क्रिकेटपटू, ब्रँड अँबेसेडर आणि माणूस म्हणून माझ्या टिप्पण्यांमध्ये संतुलन असायला हवे. मी कमेंट करतो, असे काही लोक म्हणतात. हे खरे नाही. भारतात माझे खूप चाहते आहेत. मी एक भाग्यवान पाकिस्तानी आहे, जो भारतीयांना आवडतो. यात कोणताही संदेश नाही, असे शोएब अख्तरने पुढे म्हटले.

Comments
Add Comment