मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काही दिवस वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा, सभागृह तसेच सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. मात्र, आता या बैठका प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. यामुळे अखेर भाजपच्या मागणीला यश आले आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या बैठका काही दिवसांसाठी प्रत्यक्ष होऊ लागल्या. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यावर बैठका ऑनलाइन होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व बैठका प्रत्यक्ष घेण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. अखेरीस राज्य सरकारनेच आता प्रत्यक्ष बैठका घेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे भाजपच्या मागणीला यश मिळाले आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काही दिवस वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा, सभागृह तसेच सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. त्याला भाजपचा विरोध होता.