Wednesday, April 30, 2025

ग्लोबल डिझाईन स्कूल इकोल इंट्यूट लॅबचा भारतात विस्तार

ग्लोबल डिझाईन स्कूल इकोल इंट्यूट लॅबचा भारतात विस्तार

मुंबई : फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, डिजिटल आणि स्ट्रॅटेजी, इ कोल इंट्यूट लॅब डिझाईन शिक्षणात अग्रणी आणि सांस्कृतिक प्रेरणेवर दृढ विश्वास, तसेच त्याच्या विशाल आंतरराष्ट्रीय नेटवर्कसाठी ओळखले जाते. सध्या कोलकाता आणि मुंबई येथे इकोल इंट्यूट लॅब (EIL) चे कॅम्पस आहेत याच बरोबर त्यांनीं देशाची राजधानी दिल्लीच्या मध्यभागी तिसरे कॅम्पस सुरु करून भारतात विस्तार केला आहे. या कॅम्पसचे व्यवस्थापन जेएस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे, जे कंटेम्पररी डिझाइन शिक्षण प्रदान करते.

येथे दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये यूजी डिप्लोमा इन व्हिज्युअल कम्युनिकेशन अँड डिझाईन , यूजी डिप्लोमा इन गेम, आर्ट अँड डिझाईन, यूजी डिप्लोमा इन फाइन आर्ट्स, यूजी डिप्लोमा इन डिजिटल प्रॉडक्ट डिझाईन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲडव्हर्टायझिंग, डिझाईन आणि डिजिटल कम्युनिकेशन यांचा समावेश असेल. ग्लोबल स्टँडर्ड प्रोग्राम व्यतिरिक्त, भारतातील तिन्ही कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना फ्रान्स आणि ब्राझीलमध्ये सेमेस्टर एक्सचेंज करण्याची संधी दिली जाईल.

Comments
Add Comment