मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात कोरोनाकाळात महापालिकेने ३ कोटी ७५ लाख नागरीकांना जेवण पुरवले असून यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. बुधवारी काँग्रेस विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आरोप केल्यानंतर पालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने तसेच कामगारांवर जेवणाची समस्या आल्याने पालिकेकडून अशांना दोन वेळेच जेवण पुरविण्यात आले होते. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत महानगर पालिकेने ३ कोटी ७५ लाख नागरीकांना जेवण पुरवले होते तर प्रत्येक नगरसेवक प्रभागात रोज अंदाजे ५०० जणांना जेवण दिले जात असल्याची माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. त्यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर काही सामाजिक संस्था अशा प्रकारे जेवण बनवतात. त्यांना हे काम दिले असल्याचे सांगितले.