कोकणात या पर्यटनाचा आनंद घ्या !

Share

माझे कोकण : संतोष वायंगणकर

कोरोनामुळे घातलेले निर्बंध महाराष्ट्र सरकारने अनेक बाबतीत शिथिल केले आहेत. उपाहारगृह, हॉटेल्स आदी बाबतीतील शिथिलता होत असल्याने साहजिकच या दिवाळीला मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील. गेल्या दीड वर्षात लोकांना इच्छा असूनही घराबाहेर पडता आलेले नाही. आजही थोड्याफार प्रमाणात कोरोनाचे सावट जाणवते; ते तिसऱ्या लाटेचे संकट आहे की नाही? हे आजही सांगणे सर्वांनाच अवघड आहे. मात्र, तरीही काहीसा मोकळा श्वास सोडला गेला आहे. निर्बंधांची चौकट काहीशी शिथिल झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम विविध दृष्टीने जाणवत आहे.

कोकणातील उद्योग, व्यवसायालाही गेली सुमारे दोन वर्षे फार वाईट गेली आहेत. जे जगभरात परिणाम झाले, परिणाम जाणवले त्याच परिणामांची बऱ्यापैकी झळ कोकणातील व्यावसायिकांनाही अनुभवली आहे. या सर्व आर्थिक संकटातून सावरण्यासाठी कोकणातील पर्यटन व्यवसाय, हाच पर्याय आहे. आजही पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत फार गांभीर्याने विचार करताना कोणी दिसत नाहीत. या पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होणाऱ्या आहेत. या निर्माण होणाऱ्या संधीचा विचार करून त्यादृष्टीने आपली पावले पडली पाहिजेत. यातून सावरून कोणत्याही स्थितीत उभारी घेण्याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून निश्चित काही चांगलं घडेल.

कोकणातील पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांचा प्रश्न गेली काही वर्षे प्रलंबित आहेत. ताज, ओबेरॉय ग्रुपचे हे प्रकल्प जर उभे राहिले, तर खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसायाला अधिक गती मिळेल. चर्चेत आणि विरोधात, राजकीय इश्यू म्हणून हे प्रकल्प अडकले आहेत. ‘कोकणचा विकास’ या एका वाक्यावरच हे हॉटेल प्रकल्प उभे होऊ शकतील. राजकारणाची आता ‘अति खाल्लं आणि अजिर्ण झालं’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कोकणातील प्रकल्प विकास, पर्यटन व्यवसायाची उभारणी यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत कोरोना निर्बंधामुळे सगळीच बंधनं होती. जरी मास्क वापरण्याचे बंधन असले तरीही निर्बंधांच्या शिथिलतेने सर्वांनाच फार मोठा दिलासा मिळाला आहे.

कुठलेही संकट कधी सांगून येत नाही. ते अचानकपणे दत्त म्हणून दारात उभे राहाते. कोरोना विषाणूचे संकट जगासमोर उभे राहिले. कोणाला काही समजण्यापूर्वीच अखंड जगाला कोरोनाचा विळखा केव्हा पडला कोणालाच समजले नाही. यामुळे जी संधी मिळते, जे दिवस हाती येतात, त्या कालावधीत भरपूर कष्ट करून काही उभारणी करण्याचा प्रयत्न व्हायला हवा आहे. गेली दोन वर्षे कसं जगायचं या विवंचनेत आणि विचारात गेली आहेत; परंतु आता विवंचना न करता फक्त आपणाला प्रगतीच्या नव्या वाटेने अधिक गतीमानतेने पळायचे आहे. आर्थिक सक्षमतेने उभं राहण्यासाठी निश्चितच अधिक गतीमानतेने प्रयत्न झाले तरच सक्षमतेने उभारणी होऊ शकेल.

कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. यातील महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश इकडूनही पर्यटक येत आहेत. गोवा राज्यात येणारे पर्यटकही मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येत आहेत. सुरुवातीला गोव्यातील पर्यटक नकोत; कोकणची संस्कृती बिघडेल, असे म्हटले जायचे; परंतु संस्कृती बिघडायला आपली संस्कृती काही इतकी तकलादू आहे का? फक्त व्यावसायिकता एवढंच आपलं त्यामागचं धोरण असायला हवं. ज्यांना मनापासून दारू प्यायची असते, तेच दारू पितात. ‘मित्रांचा आग्रह’, ‘मित्रांनी बिघडवले’ हे सगळं खोटं असतं. आपला आपल्या मनावर ताबा असेल, तर मित्र आपणाला काय बिघडवणार? त्यामुळे कोणी सांगून, म्हणून कोणी काही बिघडण्याची आवश्यकता आणि शक्यताही नसते. त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकाला पर्यटनस्थळांचा इथल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद कसा मिळेल, हे पाहणे अधिक आवश्यक आहे. एकदा आलेला पर्यटक वारंवार कोकणात यायला हवा. असा आपला आग्रह आणि आदरातिथ्य असावे.

कोकणातील पर्यटनस्थळांची माहिती प्रत्येक हॉटेल, उपाहारगृहे यामध्ये उपलब्ध असायला हवीत. हॉटेलमध्ये, एखाद्या दुकानात पर्यटक आल्यावर त्या दुकानातील पर्यटनस्थळांची माहिती पाहून कोकणातील अन्य पर्यटनस्थळं पाहायला हवीत, असा मोह त्या पर्यटकांना पडला पाहिजे. आताच मार्केटिंगचं जग आहे. जर मार्केटिंग केल्याशिवाय कोणताही व्यवसाय उभारी घेणार नाही. कोणत्याही व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्याला ग्राहक प्राप्त होणार नाही. या दिवाळीत कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणात यायला पाहिजेत. यासाठी कोकणाने आपले स्वतंत्र मार्केटिंग तंत्र वापरले पाहिजे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कोकण आणि कोकणातील पर्यटनस्थळ तूर्तास देशभर पोहोचविली पाहिजेत. तरच, कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील आणि कोकणवासीयांना आर्थिक सक्षमतेतून दिवाळी साजरी करता येईल.

santoshw2601@gmail.com

Recent Posts

sleepwalking : झोपेत चालण्याच्या सवयीने १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव!

झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…

28 mins ago

Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…

46 mins ago

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…

2 hours ago

AI voice scam : नोकरी शोधून देता देता छोकरीलाच पटवलं आणि घातला ७ लाखांचा गंडा!

AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…

3 hours ago

Pune crime : स्वारगेटच्या मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश! तब्बल १२० मोबाईल आणि ३ लॅपटॉप जप्त

प्रवाशांनी सावध राहण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन पुणे : पुण्यातील धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच असून रोज…

3 hours ago

Rahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे ‘ही’ खास मागणी!

म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…

4 hours ago