विद्युत मीटर नसतानाही महिलेला दिले वीज बिल

वाडा (वार्ताहर) : वाडा महावितरणचा सध्या मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले देणे, विजेचा खेळखंडोबा व विद्युत मीटर नसतानाही बिले आकारणे असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. तालुक्यातील रायसल येथील एका महिलेच्या घरात विद्युत मीटर नसतानाही तिला विजेचे बिल देण्यात आल्याने सदर महिलेने तक्रार केली आहे.



तालुक्यातील रायसल या गावात रेश्मा गंगाराम गवारी ही महिला राहात असून सदर महिलेने नवीन मीटर घेण्यासाठी महावितरणकडे ११६५ रुपये भरले आहेत. मात्र, आजतागायत तिच्या घरात विद्युत मीटर बसवण्यात आला नाही. तथापि, असे असतानाही रेश्मा यांना जुलै महिन्याचे ६८ युनिट पडल्याचे दाखवून १८७० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. मीटर बसवलेला नसतानाही वीज बिल आल्याने रेश्मा यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता वाडा यांना तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रेश्मा गवारी यांनी महावितरणला दिला आहे. यासंदर्भात वाडा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि